Covid-19 आणि गर्भधारणा
आजच्या लेखात आपण covid-19 हा आजार व गर्भवती स्त्रियांची या आजारात कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
प्रथम आपण covid-19 या आजाराविषयी जाणून घेऊयात covid-19 हा या फॅमिली तील विषाणूमुळे होणारा आजार आहे त्याचे वैज्ञानिक नाव Severe Acute Respiratory Syndrome Coronavirus-2 (SARS-CoV-2) असे आहे. हा आजार 2019 या वर्षाच्या शेवटी चीनमधील Wuhan मध्ये इतर प्राण्यांमधून प्रथमच मनुष्यप्राण्याला झाला व नंतर त्याचे झपाट्याने माणसांमध्ये संक्रमण झाले.
1. हा आजार कसा पसरतो त्याची लक्षणे काय?
आजार covid-19 बाधित व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला होऊ शकतो अशा व्यक्तीच्या जवळ गेल्यास, बोलल्यास, खोकल्यास, शिकल्यास त्यामुळे बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे (droplets) मधून पसरतो हा विषाणू हवेमध्ये तीन तास राहतो तर इतर पृष्ठभाग जसे की कागद, प्लास्टिक अशा पृष्ठभागावर एक ते तीन दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे social distancing म्हणजे एकमेकांपासून किमान पाच ते सहा फूट अंतरावर राहणे आवश्यक आहे. तसेच घरातच राहणे अतिशय आवश्यक आहे.
या आजाराची लक्षणे म्हणजे ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अथवा अडचण होणे, थकवा जाणवणे ही लक्षणे आजाराची लागण झालेल्या पासून दोन ते पंधरा दिवसांमध्ये दिसून येतात. एकूण बाधित रुग्णांपैकी फक्त 5 ते 10 % लोकांनाच क्रिटिकल केअर ची आवश्यकता असते. तसेच या आजाराचे जगभरातील मृत्यूचे प्रमाण हे एकूण बाधितांमध्ये 5% पेक्षा कमी आहे. म्हणजेच जवळजवळ 95 टक्के बाधित हे पूर्ण बरे होतात.
2. आता आपण या आजारात गर्भवती स्त्रियांची कोणती काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती घेऊ.
गर्भ अवस्थेत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात तसेच त्यांच्या प्रतिकार क्षमतेमध्ये ही बदल घडतात. Pregnancy is state of Immunomodulation.
सध्या जगभरातून आलेल्या आलेल्या केस रिपोर्टनुसार गर्भवती स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता ही इतर सर्वांप्रमाणे आहे. या आजारासाठी त्या High risk नाहीत परंतु अजूनही ठोस प्रमाणात अनुमानासाठी अधिक केसेसचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
3. खालीलप्रमाणे गर्भवती स्रियांनी काळजी घ्यावी.
• गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये घरातच राहणे
• बाहेरून जाऊन आल्या कमीत कमी 30 सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
• दर ३ तासांनी वारंवार हात साबणाने स्वछ धुवावेत
• अनोळखी व्यक्ती अथवा सर्दी-खोकला-ताप असलेल्या व्यक्तीचा संपर्क टाळावा
• एकमेकांपासून किमान पाच फूट अंतर ठेवावे(social distancing)
• आपल्या नियमित ANC visit साठी आवश्यक असेल तरच आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानेच अत्यावश्यक असल्यास ओपीडीत जावे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने शक्य असल्यास नियमित तपासण्या पुढे ढकलावे.
• अत्यावश्यक तातडीचे असल्यास तसेच गर्भावस्थेत अंगावरून अधिक रक्तस्राव झाल्यास, पाणी गेल्यास(Leaking), बाळाची हालचाल कमी झाल्यास, तसेच गर्भवती स्त्रीला उच्च रक्तदाब (PIT) त्रास झाल्यास किंवा प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ञांना फोन करून भेट घ्यावी.
• जर गर्भवतीला ताप, खोकला, श्वास घेण्यासाठी अडथळा , थकवा जाणवत असल्यास आपल्या स्त्रीरोग तज्ञांना तसेच जवळील सरकारी हॉस्पिटलमधील हेल्पलाइनवर फोन करून शक्यतो ठरलेल्या वेळेतच डॉक्टरांना भेटावे. एकाच वेळी गर्दी करू नये, गर्दी टाळावी. आधीच अपॉइंटमेंट घेऊन भेटीची वेळ ठरवून घ्यावी व त्यानुसारच जावे.
गर्भावस्थेत हा आजार आईकडून बाळाला होतो का?
– या आजारावरील आजपर्यंत जी मर्यादित माहिती केस रिपोर्ट आहेत त्यानुसार कोणतेही ठोस अनुदान आपण काढू शकत नाही.
COVID – 19 गर्भवती ची प्रसूती कोणत्या प्रकारे करावी?
– COVID – 19 गर्भवतींची प्रसूती ही नॉर्मल अथवा सिजेरियन पद्धतीने करावी हा निर्णय तिच्या obstetric indications नुसार स्त्रीरोग तज्ञ व त्यांची टीम घेऊ शकते.
हा आजार स्तनपान करताना आईकडून बाळाला आईच्या दूध (breast milk) द्वारे होऊ शकतो का?
– त्यांना पानाचे स्वतःचे अतिशय फायदे आहेत त्यामुळे covid-19 बाधित स्त्रियांची बाळाला स्तनपान करावे की न करावे याविषयी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, बाळाचे आईवडील एकत्र येऊन स्तनपानाचे फायदे व आजार घेण्याची शक्यता (Risk) यांचे मूल्यमापन करूनच निर्णय घेऊ शकतात.
हा आजार नवीन असल्याने अधिक माहिती व ठोस अनुमान यासाठी अधिक केस स्टडीज उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी काही काळ आपल्याला थांबावे लागेल या विषयाची अधिक माहितीसाठी आपण या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेऊ शकतात.
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019